| पनवेल | वार्ताहर |
आरिन फाऊंडेशन नवी मुंबई अणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भिवंडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंबीपाडा भिवंडी या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील मुला-मुलींना 150 मोठ्या स्कूल बॅग व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी आश्रमशाळेचे अधीक्षक महादेव भंडारे, स्त्री अधिक्षीका माधुरी लोखंडे व शाळेचे सर्व कर्मचारी संजय परदेशी, गणेश पाटील, दीपक वसतकर, दिगंबर गाडे, चंद्रशेखर हेंडवे अणि आरिन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचे संस्थापक सुरेश दुधाने तसेच प्रकल्प अधिकारी किरण जाधव उपस्थित होते.