| अलिबाग | वार्ताहर |
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर 2024 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी आपण स्वत: आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या अर्जाच्या अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रवींद्र शेळके यांनी कळविले आहे.