| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर नडाळ गावाजवळ एका पिकअप गाडीने समोरील रस्ता ओलांडणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दुचाकीवरील चालक आणि एक महिला जखमी झाली आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गवरून मुंबईकडून पिकअप (एमएच 16-सीसी-1702) हा चालक अखिल बाबुलाल बागवान (34, रा. मालंगी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) घेऊन जात असताना तो नडाळजवळील श्रीराम ऑटो मॉलसमोर आल्यानंतर दुचाकी क्रमांक (एमएच 05 डीवाय 8315) वरील चालक कुंदन गणेश पवार (20, रा. ओवळे व पाठीमागे बसलेली महिला तेजस्विनी रमेश वारंगे, 19, रा. जासई) हे नडाळ चौक रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणार्या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चालक आणि महिला गंभीर जखमी झाली असून, तयांना तात्काळ चौक येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.