रणसंग्राम नागाव विरुध्द श्रीगणेश आदाड मुरुड यांच्यात सामना रंगला
। अलिबाग । वार्ताहर ।
सिध्दी विनायक क्रिडामंडळ गरुडपाडा याच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबडी संघटनेच्या मान्यतेने स्वर्गीय प्रविण भास्कर कदम यांच्या स्मरणार्थ रविवारी एकदिवसीय जिल्हास्तरीय कबडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या र्स्धेत जिल्हातील निमंत्रित 32 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन अनिल पाटील शेकाप तालुका चिटणीस याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कावीर सरपंच राजेंद्र म्हात्रे, प्रेरणा कदम, सतीश भगत, गजानन पाटील, महेश म्हात्रे, अजित ठाकूर, मोहिनी भगत, मोहिनी मानकर, सुधाकर ठाकूर, आदि मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत रणसंग्राम नागाव विरुध्द श्रीगणेश आदाड मुरुड याच्यातील सामना खुपच रंगतदार झाला.