करूणेश्‍वर वृद्धाश्रमातील आजी, आजोबांची दिवाळी

| उरण | वार्ताहर |

केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर, सुभाषशेठ भोपी, भारत भोप व मित्र परिवार यांच्या सहकार्यातून पनवेल तालुक्यातील नेरे-भानघर येथील करूणेश्‍वर वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गोड खाऊंचे वाटप, ब्लँकेट्स, सुगंधी उटण्याचे पाकीटचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळी पहाट निमित्त सुरेल गीत गायनाचा कार्यक्रम अर्थातच स्वर दीपावली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासोबतच उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठी, भुर्‍याची वाडी, खोड्यांचीवाडी, बंगल्यांची वाडी, मार्गाचीवाडी या आदिवासी वाड्यावर आदिवासी बांधवाना दिवाळी फराळाचे पाकीट, रिअल फ्रेश ज्यूस (नारळ पाणी), ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version