| मुंबई | प्रतिनिधी |
ग्रंथाली आणि अॅड फिझ आयोजित ‘स्वर अमृताचा’ हा बहारदार गीतांचा दिवाळी पहाट कार्यक्रम वीर सावरकर स्मारक सभागृह, दादर येथे साजरा झाला. यावेळी निरलस कार्य करणार्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘ध्यास सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. गगन सदन तेजोमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे हे अठरावे वर्ष. स्वर अमृताचा शीर्षकाच्या या कार्यक्रमात अमराठी गायकांनी गायलेली अजरामर आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
ऋषीकेश कामेरकर, केतकी भावे-जोशी, डॉ. जय अजगांवकर, श्रीरंग भावे, कृतिका बोरकर या तरुण कलाकारांनी उत्कृष्ट गायलेल्या या अप्रतिम गीतांना कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनामध्ये लोकप्रिय वादकांनी रंगतदार साथ दिली. शब्द रुची मासिकाचे संपादक अरुण जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे रसाळ व माहितीपूर्ण निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.
या कार्यक्रमात समाजात निरपेक्ष सेवा करणार्र्या तीन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जत येथील दत्तात्रय वारेसर, सांगोला वाटांबरे येथील मधुकर पवार, फलटण येथील सुहासिनी माने यांचा यामध्ये समावेश आहे. सूत्रसंचालन महेंद्र पवार यांनी केले.
ग्रंथाली दिवाळी अंक संचफ योजनेत नोंदणी करणार्या व प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांसाठी हा कार्यक्रम ध्वनीचित्रमुद्रित करण्यात आला असून, 24 तारखेला दिवाळीच्या पहाटे 4 वाजल्यापासून Granthali Watch या यू ट्यूब चॅनेलवर घरीही पाहता येण्याची सोय ‘ग्रंथाली’द्वारा करण्यात आली आहे. तसेच, दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून दर्जेदार नव्या कथा ऐकण्याची आगळी दिवाळीभेट ग्रंथालीने संचनोंदणी करणार्या रसिकांना दिली असल्याचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी म्हटले आहे.