भिवंडी महापालिकेचे आवाहन
। ठाणे । प्रतिनिधी ।
पुणे येथे जिबीएस या आजाराचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या आजाराला घाबरुन जाण्याचे कारण नाही. आजारामध्ये बाधीत रुग्णांची मज्जातंतूवर आघात झाल्याने हा आजार संभवतो. या आजाराची लागण सर्वसाधारणतः सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो. या आजाराचे अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच, आजाराबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करुन कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच, या आजारा संदर्भात शंका आल्यास त्वरीत आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भिवंडी महानगरपालिका आयुक्त व वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.