रामाचीवाडीत घरोघरी नळजोडणी; पाण्यासाठीची वणवण थांबली

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील रामाचीवाडी येथील महिलांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामोरे जावे लागत होते. महिलांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागत असे.

कर्जत तालुक्यातील अजूनही अनेक गावे आणि वाड्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. काही सामाजिक संस्था महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण पाहता सामाजिक भावनेतून स्वखर्चाने पाण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. असेच काम बोरिवली ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या रामाचीवाडी येथील भीषण टंचाई समस्या लक्षात घेऊन, शहाड येथील सेंच्युरी रेयॉन यांनी गावापासून दोन कि.मी. अंतरावरील विहिरीत पंप टाकून पाईप लाईने गावात पाणी आणून गावातील मुख्य ठिकाणी दहा हजार पाणी साठवण करण्यात आले आहे.

यानंतर ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाच्या शुध्द जल मिशनअंतर्गत खर्च करून गावातील प्रत्येक घरात नळजोडणी करून रामाचीवाडी येथील पाण्याच्या समस्या कायमची सोडवली आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंजप गावचे पोलीस पाटील भालचंद्र थोरवे, युवासेना नेते प्रसाद थोरवे, रमेश मते, पंकज पाटील, दीपक भोईर, अमर कुंभार, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version