जंजिर्‍याचे दरवाजे लवकरच उघडणार

25 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी होणार खुला

| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |

पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणात्सव ऐतिहासिक जंजिरा किल्ला शासनाकडून बंद ठेवण्यात आला होता. चार महिन्यांपासून जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांनाही प्रतीक्षा लागून गेली होती. पावसाहा संपत आल्याने किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. पुरातत्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुरातत्व अधिकारी येळीकर यांनी दिली. 25 सप्टेंबरपासून जंजिरा किल्ल्याचे दार उघडणार असल्याने पर्यटक आणि स्थानिक आनंदी झाले आहेत.

25 मे रोजी कोकणातील मासेमारी व इतर जलवाहतूक नियमानुसार बंद करण्यात येते. तसेच जंजिरा किल्ल्यातील शिडाच्या बोटी देखील बंद केल्या जातात; परंतु 1 ऑगस्टला मासेमारी करणार्‍या बोटींना मासेमारीसाठी परवानगी देण्यात येते, त्यामुळे जंजिरा किल्ल्यातील प्रवेश सुरू करण्यात यावा, अशी मागणी येणारे पर्यटक करत आहे. परंतु, पावसाळ्यानंतर जंजिरा किल्ल्यात स्वच्छता करण्याचे काम असल्याने 25 सप्टेंबरला जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार, असे पुरातत्व अधिकारी येळीकर यांनी सांगितले. 1 सप्टेंबरला बोटधारकांच्या सहकार्याने स्वच्छतेला सुरुवात करण्यात येणार असून, स्वच्छता झाल्यास लवकर किल्ला पर्यटकांसाठी खुला करू, अशी माहिती येळीकर यांनी दिली.

साडेतीनशे वर्षांचा इतिहास
जंजिरा किल्ला हा अलिबागपासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुड किनार्‍यावरील बेटावर स्थित एक मोठा आणि शक्तिशाली किल्ला आहे. मरुड जंजिरा किल्ला सुमारे 350 वर्षे जुना असल्याचे मानले जाते आणि ते बांधण्यास 22 वर्षे लागली होती.
किल्ल्याची तटबंदी अभेद्य
जंजिरा किल्ल्याची उंची समुद्र किनार्‍यापासून सुमारे 90 फूट आहे आणि तिच्या पायाची खोली सुमारे 20 आहे. जंजिरा किल्ला 22 एकर जागेत 22 सुरक्षा चौकांसह 22 एकरांवर पसरलेला आहे. या किल्ल्यावर सिद्दी राज्यकर्त्यांनी राज्य केले आणि अनेक वेळा इतर राज्यकर्त्यांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
Exit mobile version