वेटलिफ्टिंगमध्ये डबल धमाका

जेरेमी लालरिनुंगाला सुवर्ण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे.
स्पर्धेत भारतानं पाच पदके जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहे. दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगापूर्वी शनिवारी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. त्याचवेळी ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला चौथे पदक मिळवून दिले. त्याने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 130 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.

Exit mobile version