| पनवेल | वार्ताहर |
लोडींग अनलोडींगचे काम सुरू असताना एका ट्रेलरची धडक बसल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सी.जे.डार्सल लॉजिस्टीक कंपनीच्या मोकळ्या मैदानात घडली आहे. संतोषकुमार भार्गव (44) असे मृत इसमाचे नाव असून, या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.