| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा बुधवारी (दि.7) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघातची घटना घडली आहे. या अपघातात दोन्हा वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावातील पेट्रोल पंपाजवळ एका डंपर चालकाने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. डंपर चालक धर्मराज मुन्नीलाल कोल (30) हा विरूद्ध दिशेने व अतिवेगाने गाडी चालवत आल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रवि राजगुरू (26) असे पिकअप चालकाचे नाव असून त्याला लहान-मोठ्या स्परूपाच्या जखमा झाल्या आहेत. डंपर चालकावर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एम. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार कुथे हे करीत आहेत.