। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीवदेखील गमवावा लागला आहे. दरम्यान, युक्रेनमधील 30 लाख नागरिकांनी देश सोडलाय. तर, 60 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी ब्राझीलचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर पुढे आला असून, फेडरर फाऊंडेशननं या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी 3.8 कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉजर फेडररनं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं जवळपास 60 लाख विद्यार्थ्यी शाळेत जाऊ शकत नाही. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधील मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी रॉजर फेडरर फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही युद्धग्रस्त मुलांना 3.8 कोटी रुपयांची मदत करणार आहोत, असं आश्वासन फेडरर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे
कोट..
युक्रेनमधील परिस्थिती पाहून मी आणि माझे कुटुंब खूप घाबरलो. निरपराध लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. हे हृदय हेलावणारे आहे. आम्ही येथे शांततेसाठी उभे आहोत. आम्ही युक्रेनमधील गरजू मुलांना आम्ही मदत करू.
रॉजर फेडरर, टेनिसपटू