। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतच्या बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक डबलडेकर बसचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन करण्यात आले. प्रदूषणाच्यादृष्टीने इलेक्ट्रीक बस हे प्रदूषणमुक्त देशासाठी महत्वाचे पाऊल असल्याच त्यांनी म्हटले आहे. तसेच इलेक्ट्रीक बसने प्रवास करणे खूप स्वस्त असल्याचेही गडकरी म्हणाले. लक्झरी बसचा प्रवास सुरू करण्याच्या विचारावरही यावेळी त्यांनी भर दिला. लांब पल्ल्याचा प्रवासही या प्रकारच्या बसने करता येईल. या बसने मुंबई-दिल्ली असा 12 तासांचा प्रवास करणे शक्य होईल, असेही गडकरी यांनी म्हटले.