| माणगाव | वार्ताहर |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाडमध्ये मंगळवारी (दि.16) ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त महाविद्यालयातील नेचर क्लब व विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयाच्या प्रा. प्रिया कदम आणि प्रा. माधुरी कांबळे, प्राचार्य सुदेश कदम, उपप्राचार्य राकेश वडवलकर आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी प्रा.प्रिया कदम यांनी सद्यस्थितीत ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व तसेच हिरवेगार आणि पर्यावरणपूरक भविष्याची हमी देण्यासाठी शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे का आवश्यक आहे यावर माहिती सांगितली. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांनी शाश्वत संस्कृतीला चालना देण्यासाठी महाविद्यालयाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.