। लंडन । वृत्तसंस्था ।
ओली वॅटकिन्सने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने युरो 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना तीनवेळचा चॅम्पियन स्पेनशी होणार आहे. फ्रान्सचा पराभव करून स्पेनने अंतिम फेरी गाठली होती.
या सामन्यात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नव्हती, कारण झेवी सिमन्सने नेदरलँडसाठी पहिला गोल केला. मात्र, इंग्लंडनी सामना 2-1 असा जिंकून शेवट चांगलाच केला. इंग्लंडने सलग दुसर्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. शेवटच्या वेळी 2021 मध्ये इटलीविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. नेदरलँडविरुद्ध खराब सुरुवातीनंतर हॅरी केनने पुनरागमनाचा पाया रचला. जर्मन रेफ्री फेलिक्स झ्वेअरने व्हीएआर कॉल केल्यानंतर हॅरी केनच्या पेनल्टीमुळे इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आणि अतिरिक्त वेळेत वॉटकिन्सने केलेल्या शानदार गोलने त्यांना विजय मिळवून दिला.