। खांब । वार्ताहर ।
पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामीण भागात जनजागृती निर्माण करण्यासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर विभागाने आणि रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मुठवली बु. येथे एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सुदर्शन कंपनीच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा महत्त्वाचा भाग असलेल्या भारुड माध्यमातून प्रभावीपणे संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरीकरण अनिल सावळे यांनी केले. यावेळी पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त गाव, ओला-सुका कचरा वेगळा करणे, पुनर्वापर आणि पुनर्विकसन यासारख्या मुद्द्यांवर भारुडाच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र पोटफोडे, रोहाचे विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, सुदर्शन सीएसआर विभागाचे महेश डेरिया, गट विकास अधिकारी शुभदा पाटील, सुरेश पाटील, प्राईड इंडियाचे व्यवस्थापक वसंत मोरे, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप पाबरेकर, गोविंद शिद, ग्रामपंचायत कर्मचारी, नो हाऊ फाउंडेशनचे प्रतिनिधी, भालेराव, विनय देशमुख, श्रद्धा भगत तसेच सुदर्शन सीएसआरचे अमर चांदणे हे उपस्थित होते.