| उरण | वार्ताहर |
विरार-अलिबाग बहुद्देशीय कॉरिडॉर हा महत्त्वाचा राज्य महामार्ग सरकार उरण तालुक्यातील बाधित शेतकर्यांना विश्वासात न घेता कवडीमोल भावाने शेतजमिनी भूसंपादन करुन बनविण्याचा घाट घालत आहेत. त्या विरोधात शेतकर्यांनी 6 फेब्रुवारीला कोकण आयुक्त कार्यालयावर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. अलिबाग- विरार कॉरिडॉरमध्ये पनवेल, उरण, पेण तालुक्यातील 124 गावातील शेतजमिनीतून जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, शेतकर्यांच्या जमिनीला योग्य बाजार दराने मोबदला न देता कवडीमोल भाव शेतजमिनीला देत असतील तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. आमची मागणी ही किमान 50 लाख रुपये प्रति 100 चौरस मीटर भाव मिळावा अशी आहे, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे.