| पाली | वार्ताहर |
पाली पाटणूस मार्गावर झाप गावाजवळ सोमवारी (दि.9) दुपारी दोन कारचा अपघात झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. तर दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इर्टिगा कार पाली बाजूकडून पाटणूस-विळे बाजूकडे जात होती. व ह्युंदाई कार पाली बाजूकडे जात होती. यावेळी ह्युंदाई कारने इर्टिगा कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की ह्युंदाई कारचे चाक निखळून रस्त्यावर गेले व गाडी उलट्या दिशेला फिरली तर इर्टिगा कार बाजूला शेतात गेली. यावेळी ह्युंदाई कारमधील चालक गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर इर्टिगा कारमधील प्रवासी व चालक सुखरूप होते.