| कोलाड | वार्ताहर |
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. त्यातच जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काही भागात उन्हाळी भात शेती केली जाते. यावर्षी भातशेती चांगली येऊन ही अवकाळी पावसाने उध्वस्त झाली. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली. परंतु, रोपे वाढीसाठी युरिया खताची आवश्यकता आहे. परंतु, तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी 1 हजार 75 मे टन युरियासह विविध प्रकारच्या खताची आवश्यकता आहे.
ऐन खरीप हंगामात रोहा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असुन युरिया खताच्या खरेदीसाठी विविध ठिकाणी धावपळ करून ही खत उपलब्ध होत नाही. आता भाताची रोपे चांगल्या प्रकारे उगवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु रोपांची लवकर वाढ होण्यासाठी युरिया खताचा मारा केला जातो. तालुक्यात खताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना विविध ठिकाणी धावाधाव करत आहेत. परंतु, तिथे ही खत उपलब्ध होत नाही.
युरिया खत सर्वात महत्वाचे नायट्रोजन युक्तखत आहे. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तात्काळ लागू पडते. पिकांची वाढ जोमाने होते. पिकांना हिरवा गडद मिळतो. तसेच इतर रासायनिक खतापेक्षा युरिया खताची किंमत कमी असते. मात्र, खत विक्रेत्यांकडे युरिया खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला. असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.