पीसीबीची नोटीस
| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. 30 ऑगस्टपासून आशिया कपचा थरार रंगणार आहे त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही संघाची घोषणा केली आहे.याच दरम्यान अमेरिकेतील टी-20 लीगमध्ये सहभागी झालेल्या 15 हून अधिक खेळाडूंना बोर्डाने नोटीस पाठवली आहे. या खेळाडूंनी बोर्डाकडून एनओसी न घेताच स्पर्धेत सहभागी घेतला होता, यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे.
क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एनओसीशिवाय अमेरिकेत उतरलेल्या खेळाडूंना नोटीस पाठवली आहे. काही खेळाडूंनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना एनओसी घेण्याची गरज नाही. मात्र, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंकडून नागरिकत्वाची कागदपत्रे मागितली, जेणेकरून राष्ट्रीय संघात किंवा देशांतर्गत संघातील त्यांचे भवितव्य ठरवता येईल. अद्याप या खेळाडूंनी याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही.
सोहेब मकसूद, अर्शद इक्बाल, अरिश अली, हुसैन तलत, अली शफीक, इमाद बट, उस्मान शेनवारी, उम्मेद आसिफ, झीशान अश्रफ, सैफ बदर, मुख्तार अहमद आणि नौमन अन्वर यांनी अलीकडील ह्यूस्टन ओपन स्पर्धेदरम्यान पीसीबीकडून एनओसी घेतली नाही. त्याचप्रमाणे सलमान अर्शद, मुस्सादिक अहमद, इम्रान खान ज्युनियर, अली नासिर आणि हुसैन तलत यांनीही सध्या सुरू असलेल्या मायनर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची परवानगी घेतली नाही.
दुसरीकडे, फवाद आलम, हसन खान, आसिफ मेहमूद, मीर हमजा, शरजील खान आणि अन्वर अली यांनी पीसीबीकडून एनओसी घेतली. पीसीबीने परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यापूर्वी एनओसी मिळविण्यासाठी 10,000 म्हणजेच सुमारे 8.5 लाख रुपयांची अट घातली होती. ही रक्कम खेळाडूला नाही तर त्याच्या संघाला द्यायची आहे.
जर एखाद्या संघाने एका खेळाडूसाठी परवानगी घेतली आणि नंतर त्यांनी दुसऱ्याखेळाडूवर स्वाक्षरी केली तर त्यांना अतिरिक्त 8.5 लाख रुपये द्यावे लागतील. पीसीबीने ह्यूस्टन ओपनसाठी संघांकडून एनओसीसाठी शुल्क आकारले, परंतु खेळाडूंच्या विनंतीनंतर, त्यांना कोणत्याही पैशाशिवाय लहान लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली.