| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेलमधील सुखापूर रोडवरील साई सोसायटीमध्ये असलेल्या शूज नॅशनल एक्स दुकानाला आज मंगळवारी (दि.22 )रोजी पहाटे 4.40 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.
निलेश घोडके यांनी अग्निशमन केंद्रात माहिती दिली. आयसीसीआय बँकेसमोरील सेक्टर-1 प्लॉट क्रमांक 3 साई सहनिवास सहकारी सोसायटीमधील शूज एनएक्स दुकानातून धूर येत आहे. तातडीने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. दुकान बंद असल्याने दुकानाचे शटर लॉक कटरच्या मदतीने तोडण्यात आले. आग मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन केंद्रातील पाण्याचा टँकर तसेच, जुने पनवेल अग्निशमन केंद्रातून मदतीकरीता अंकुश येळे प्रमुख अग्निशामक विमोचक आणि टीम हे वाहनासह उपस्थित झाले आणि आग आटोक्यात प्रयत्न करण्यात आला. परंतु, दुकानांमध्ये अधिक सामान असल्याने पोट माळ्यावरील आग विझवण्यात अडथळा येत होता. त्यामुळे आरोग्य निरीक्षक अनिकेत जाधव सर यांना संपर्क करून त्यांच्याकडून जेसीबी ची मदत घेण्यात आली. जेसीबीच्या साह्याने तेथील साहित्य बाजूला करून आग पूर्णपणे विझविली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित पवार, उप पोलीस निरीक्षक अशोक महाजन हे उपस्थित होते. या घटनेची माहिती प्रवीण बोडके मुख्य अग्निशमन अधिकारी यांना देण्यात आली.