| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर शहराजवळील लोहारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या उंबरकोंड येथील शेतकरी सोनू सकपाळ यांची कन्या रुपाली सकपाळ ही पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिचे शिक्षण पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता 12 वी पर्यत तर नवी मुंबई येथील केडिस कॉलेजमधून पदवीपर्यत शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती ग्राऊंड परीक्षा उत्तीर्ण झाली. 23 मार्च 2023 मुलाखतदेखील उत्तीर्ण झाल्याने रुपालीची नाशिक येथे उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.