। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगावचे माजी पोलीस पाटील सुभाष पारखे यांचे थोरले बंधू रमेश भगवान पारखे यांचे शुक्रवारी (दि.7) सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी जुने माणगाव बाजारटेप येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, चार मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने समस्त पारखे परिवारावर शोककला पसरली आहे.
कै. रमेश भगवान पारखे यांच्यावर माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कै. रमेश भगवान पारखे यांचा दशक्रिया विधी रविवार, दि.16 मार्च रोजी, तर उत्तरकार्य विधी मंगळवार, दि.18 मार्च रोजी राहते घरी जुने माणगाव बाजारटेप येथे होणार असल्याची माहिती त्यांचे धाकटे बंधू सुभाष पारखे यांनी दिली.