| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पिकअप टेम्पोचालकाने निष्काळजीपणे वाहन पाठीमागे घेतल्याने रस्त्याच्या बाजूने आईसह पायी चालत जाणारी चारवर्षीय मुलगी टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.29) सकाळी खारकोपर येथे घडली. या अपघातानंतर उलवे पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे. नायला खान (4) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, ती उलवे येथील खारकोपर येथे कुटुंबासह राहण्यास होती. बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नायला आईसोबत दवाखान्यात पायी जात होती. दरम्यान, खारकोपर गाव येथून उलवे सेक्टर आठच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपचालकाने वाहन निष्काळजीपणे मागे घेतले. या वेळी आईसह चालत जात असलेल्या नायलाला पिकअपची धडक लागली. त्यामुळे ती पिकअपच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर उलवे पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.