फसवणूक करणाऱ्या टोळीला करण्यात आली अटक
| पनवेल | वार्ताहर |
कामोठे येथील व्यावसायिकाची ऑनलाइन 2 कोटी 24 लाखांची फसवणूक झाली होती. इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस मिळवण्याच्या बहाण्याने त्यांना रक्कम गुंतवण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांची रक्कम हडप करून फसवणूक झाली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी हरयाणामधून तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी उपनिरीक्षक रोहित बंडगर, पूनम गडगे, संदेश गुजर, अनिकेत पाटील व नरहरी क्षीरसागर यांचे पथक केले होते. त्यांनी फसवणूक केलेली रक्कम कोणत्या खात्यात गेली हे शोधले.
यासाठी सायबर विश्लेषणाचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या पूनम गडगे यांनी कौशल्य पणाला लावले. ऑनलाइन फसवणूक झालेल्या 2 कोटी 24 लाखांपैकी 1 कोटी 80 लाख रुपये हे प्रशांतच्या खात्यावर गेले होते. दरम्यान गुन्ह्यासाठी त्यांनी विविध बँकांतील 12 बनावट खाती वापरली होती. त्यामधून काही रक्कम प्रशांतच्या खात्यावर वळवली होती. अज्ञात व्यक्तींच्या नावांचे गुन्ह्यासाठी त्यांनी सीमकार्ड वापरले होते. त्याच्यासह पाच मोबाइल हस्तगत केले आहेत. त्याच्यावर मुंबईत यापूर्वीदेखील गुन्ह्यांच्या ऑनलाइन फसवणुकीचा एक गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे. सापळा रचून प्रशांत चमोली याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर परवेज शरीफ व रणजित तिवारी यांनाही अटक केली आहे.