| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यात टेलिग्राम ॲपद्वारे लाखोंची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. 12 ते 14 ऑगस्टदरम्यान फिर्यादी डॉ. इस्माईल हुसेन रहाटविलकर यांच्या मोबाईलवर आरोपी संध्यादेवी, बना पारेख, नोरा, राधिका यांनी टेलीग्राम ॲपद्वारे खोटे आयडी बनवून फिर्यादी यास संपर्क साधून त्यांना ऑनलाईन एन.वाय.एस.ई.मार्फतीने यूट्युब व्हीडीओ सबस्क्राईब व ट्रेडींग करुन आपणास मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्यांच्याकडून आरोपी क्र. 1 व 4 यांनी संगनमत करून 12,29,250/ रुपये वेळोवेळी वेगवेगळ्या अकाऊंटवर ऑनलाईनद्वारे घेऊन त्याची अर्थिक फसवणूक केली. आजतागायत त्यांना काहीएक रक्कम परत मिळाली नाही. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.