। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील डॉ. सुधाकर बडगिरे हॉस्पिटल आणि श्रव्य कोकलियर इम्प्लांट प्रोग्रॅम, डॉ. मिनेश जुवेकर (बॉम्बे हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः मूक-बधिर असणार्या 3 वर्षापर्यंतच्या मुलांच्या तपासणीचे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णपणे मोफत असणार्या या शिबिरांतर्गत 3 वर्षापर्यंतच्या मुलांचे मोफत शस्त्रक्रिया करून कोकलियर इम्प्लांट केले जाते. बाहेर या शस्त्रक्रियेचा खर्च जवळ जवळ सहा लाखांपर्यंतचा आहे. तो इथे गरीब आणि गरजू मुलांना मोफत मध्ये करून दिला जातो, अशी माहिती डॉ.सुधाकर बडगिरे यांनी दिली.
श्रव्य कोकलियर इम्प्लांट प्रोग्रॅम यांच्या अंतर्गत आतापर्यंत 170 पेशन्ट्स ना मोफत उपचार केले आहेत. अधिक माहितीसाठी www.cochlearimplantmumbai.com या संकेतस्थळी किंवा बडगिरे हॉस्पिटल, अलिबाग येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.