| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान शहरातील इंदिरा नगर भागात विक्रांत युवक मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा 44 वर्षांचा झाला आहे. यावर्षी प्रथमच हा बाप्पा खासगी जागेत बसविण्यात आला असून, तेथील गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने बाप्पाची खासगी जागेत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
बाप्पाची स्थापना विकांत मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत सुतार यांच्या घरी करण्यात आली. विक्रांत युवक मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत सुतार, विजय मोरे, कल्पेश शिंदे, सीताराम मांडवकर, बाबू ढेबे, मालू ढेबे यांच्या लहानपणातील दगडाचा गणपती खेळताना तयार झाला. त्याला जयराज कळंबे यांनी मातीमध्ये आकार दिला आणि तो गणपती बापा तेथील मंदिरात स्थापित झाला.
मंदिरात विक्रांत युवक मंडळाने आतापर्यंत दीड दिवसाचा गणपती सण साजरा करताना माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीनुसार विविध देखावे सादर करून अनेक समस्यांना लोकांसमोर आणल्या आहेत. युवक मंडळाचे कार्यकर्ते यांच्या एकीमुळे या मंडळाला माथेरान पोलिसांकडून देणार्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.