कार्लेतील शेतकर्यांचा अभिनव प्रयोग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
लग्न समारंभ, अन्य कार्यक्रमांसाठी पुष्पगुच्छ, हाराला प्रचंड मागणी आहे. त्यात जर्मन फुलांना अधिक पसंती असते. अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील शेतकर्यांनी त्यांच्या शेतामध्ये जर्मन फुलाचा मळा फुलविला आहे. दर दिवशी हजारो फुले अलिबागसह अन्य बाजारात विक्रीला पाठविला जात असल्याने यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे.

अलिबागमध्ये कार्लेतील पांढरा कांदा ज्याप्रमाणे पसंतीस उतरला आहे. त्याच प्रमाणे जर्मन फुलांना देखील मागणी वाढत असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. जर्मनची फुले, पिवळी, व लाल असल्याने ती दिसायला आकर्षित असतात. पुष्पगुच्छ व हार बनविण्यासाठी या फुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केल जातो.
भात कापणीची कामे संपल्यावर जर्मन फुलांची लागवड कार्ले परिसरात केली जाते भातशेतीला जोड धंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. नोव्हेंबर महिन्यात या फुलांची लागवड केली जात असून जानेवारीला म्हणजे दोन महिन्यात फुले तयार झाली आहेत. नियमितपणे एक हजार रुपये किंमतीची फुले शेकडो 40 पासून 25 रुपयांनी अलिबागच्या बाजारात विकली जात आहेत. या फुलांपासून शेतकर्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याने याची लागवडी कार्ले परिसरात शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे.
जर्मन फुलांना बाजारात प्रचंड मागणी आहे. या फुलांची लागवड शेतामध्ये केल्याने त्यातून चांगला फायदा होत आहे. रोज शेकडयाने विक्रेत्यांना फुले विकली जात आहे. अलिबागच्या बाजारात ही फुले विक्री केली जात आहेत.
सतिश म्हात्रे – फुल उत्पादक शेतकरी