। तळे । वार्ताहर ।
जी.एम.वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळे येथे शनिवारी (दि.3) स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महाविद्यालयातील जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी सजग राहून शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. आजच्या पिढीमध्ये शिक्षणाबद्दलची असणारी अनास्थाही त्यांच्या भविष्यासाठी खूप हानिकारक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाविद्यालयामध्ये दि.29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रीडा विभागाकडून क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ यासारख्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाकडून रांगोळी स्पर्धा, भित्तिपत्र स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, फूड स्टॉल या स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्व स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.