| उरण । वार्ताहर ।
उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार पत्रकार संघाच्या कार्यालयात करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, संजय गायकवाड, संतोष पवार, आशिष घरत, विरेश मोडखरकर, अजित पाटील, सुयोग गायकवाड, वैशाली कडू, पूजा चव्हाण यांच्या हस्ते आर्यन मोडखरकर, हितेश भोईर, जयदीप सिंग यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची त्यांच्या कार्यालयात उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जलतरण तलावात उरणच्या सुवर्णपदक विजेत्यांना सराव करण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी इंगळे यांनी आपण याबाबत लवकरच चर्चा सकारात्मक निर्णय देऊ असे सांगितले.