| वाघ्रण | वार्ताहर |
एक भारत श्रेष्ठ भारत (औरंगाबाद) एनसीसी कॅम्प औरंगाबाद येथे घेण्यात आला. सदर कालावधी मध्ये ना.ना.पाटील हायस्कूल मधील कॅडेट जय महेश पाटील, गौरव दत्तेश डिंगणकर या छात्रांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सुवर्णपदक मिळवले.
या छात्रांना शाळेचे एनसीसी अधिकारी श्री भंडारे एस.एस. यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे सभापती माजी.आम. पंडित पाटील, मुख्याध्यापक के.के फडतरे, सत्रप्रमुख खरसंबळे मॅडम व शाळेतील शिक्षक वृंद या सर्वांनी अभिनंदन केले.