दिघोडे तलावाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन

| चिरनेर | प्रतिनिधी |

गेली अनेक वर्ष बांधकाम, दुरुस्ती व मजबुतीकरण तसेच सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिघोडे येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या नियोजित कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.16) पार पडले. चिरनेरचे उद्योगपती पी.पी. खारपाटील यांच्या हस्ते तलावाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. या तलावाच्या सुशुभिकरणाचे काम पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्यावतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांनी दिली. यावेळी पी.पी. खारपाटील कंट्रक्शन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील, सरपंच कीर्तीनिधी ठाकूर, उपसरपंच कैलास म्हात्रे, माजी सरपंच अविनाश पाटील, पांडुरंग कोळी, अभिजीत पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य संदेश पाटील, अलंकार कोळी, उज्वला म्हात्रे, अपेक्षा कासकर, अपेक्षा पाटील, आरती कोळी, रेखा कोळी, ग्रामविकास अधिकारी मत्स्यगंधा पाटील, एकनाथ माळी, महादेव पाटील, श्रावण घरत आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. या तलावाच्या सुशोभिकरणामुळे गावाची शोभा वाढणार असून, तलावातील पाण्याचा वापर येथील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या कामाकरता करता येणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version