| पनवेल | प्रतिनिधी |
सायबर गुन्हेगारीही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे जागतिक समस्या आहे. अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. मात्र, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. याबाबत करंजाडे येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे ई-मेलद्वारे होणारा छळ, सायबर स्टॉकिंग (सायबर विश्वातून होणारा पाठलाग), सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता), सायबर डीफमेशन (बदनामी), मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे), ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी) आदींचा समावेश आहे.
करंजाडे नोडमधील माता-भगिनींच्या आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विनाशुल्क जनजागृती कार्यक्रम करंजाडेतील प्रथमेश पुंडे, दिनेश गोल्हार, बाबासाहेब भोसले, प्रमोद आवारी, सुभाष राळे, रामचंद्र महाडिक, प्रसाद खोपडे, समीर कदम, ओंकार बोरचाटे, विकास जाधव यांनी आयोजित केला होता. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मार्गदर्शन सुरू असताना अनेक नागरिकांनी प्रश्न विचारले आणि शंकांचे निरसन केले. येणाऱ्या काळात सामाजिक संस्थांनी एक होऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत गुजर, सहकार भारती सचिव किरण शिंदे, सत्यजित पाटिल, श्रीहरी कट, सुषमा मयेकर, वैशाली जगदाळे, सूरज गुप्ता, ज्योती तोतरे, अंजु सिंग, कांता गायकवाड, सचिन शेळके, सागर यादव, प्रशांत पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली.