। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ओवे गावालगत असलेल्या एका झोपडीवर छापा मारला होता. या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या गुटख्यासह इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा खारघरमधून जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ओवे गावातील अली पब्लिक स्कूललगत मोकळ्या जागेवर असलेल्या झोपडीमध्ये एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे झोपडीवर छापा मारला होता. या कारवाईत पोलिसांनी गफूर अन्सारी (38) याला ताब्यात घेतले आहे.