| अलिबाग | वार्ताहर |
ठाणे जिल्ह्यातील म्हारळ येथे घर व कार घेण्यासाठी विवाहित महिला पूजा रूपेश आयरे (33) रा.झिराड यांचा छळ केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत 19 मे 2019 ते 5 मे 2024 दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आयरे यांचे रुपेश आयरे यांचेसोबत 19 मे 2019 रोजी लग्न झाले, लग्न झाल्यापासून ते 5 मे 2024 रोजीपर्यंत पूजा आयरे यांस त्यांचे पती रुपेश आयरे, सासु सुवर्णा आयरे, सासरे नारायण आयरे व नंणद वृषाली माने यांनी वेळोवेळी पूजा हिला आई वडीलांकडुन घर व कार घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यास भाग पाडून, मारहाण व शिवीगाळी करुन तक्रारदार यांस वारंवार शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन छळ केला. याबाबत मांडवा सागरी ठाणे पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस हवालदार अस्मिता करवाडे या करीत आहेत.