16 हजारांत हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, वैष्णोदेवी आणि बरंच काही

। पुणे । प्रतिनिधी ।
रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

28 एप्रिल रोजी पुण्यातूनच पहिली भारत गौरव रेल्वे दिव्य काशी यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. आता दुसरी रेल्वे उद्या महाकालेश्‍वर, उत्तर भारत देवभूमी यात्रेसाठी रवाना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरातून देखो अपना देश या संकल्पनेनुसार देशभरातून भारत गौरव सेवा पुरवली जात आहे. या सेवेच्या आतापर्यंत 29 फेर्‍या झाल्या असून, त्यातील 8 विविध राज्यांमधून तर 4 केंद्रशासित प्रदेशातून झाल्या आहेत. या रेल्वेने एकूण 750 प्रवासी प्रवास करणार असून 11 ते 20 मे दरम्यान ही रेल्वे उज्जैन (महाकालेश्‍वर आणि ओंकारेश्‍वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार आहे.

प्रतिव्यक्ती दर

Exit mobile version