। अलिबाग । प्रतिनिधी ।
एमकेसीएल पुणे, एलएलसी रायगड पनवेल आणि डिझाईन कॉम्प्युटर्स नागाव कार्यालय यांच्यावतीने महाराष्ट्र ओलंपिआड मोमेंट तथा मॉम 2025 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत हर्ष हेमंत तेरेकर हा अव्वल ठरला असून तो जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
हर्ष तरेकर हा विद्यार्थी नागाव येथील स. म. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून तो सध्या इयत्ता आठवीच्या वर्गात आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मॉम 2025 ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचे सादरीकरण केले. हर्ष तेरेकर याने या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला. त्याचे शाळेच्यावतीने बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.