दोन वर्षांची प्रतीक्षा संपली; पावसाळ्यापूर्वी लिपनिवावे पूल सुरू होणार

। आंबेत । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील आंबेत बागमांडला राज्यमार्गावरील लिपनिवावे पूल हा हा येत्या काही दिवसात सर्व वाहतुकीसाठी सुरू होणार असून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पुलावरून सर्व प्रवासी वर्गाला प्रवास करता येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या या पुलाची मागील दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दोन वर्षात पर्यायी वाहतुकीसाठी बनविण्यात आलेला साकव हा कमी उंचीचा असल्याने ऐन पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील पूर्ण प्रवास ठप्प होत असे ऐन वेळी या पट्ट्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्‍न निर्माण होत असे आता मात्र तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल येत्या काही दिवसात पूर्ण होत असून सर्व वाहततुकीसाठी खुल करण्यात देखील येणार असल्याचं चित्र समोर आहे. तब्बल 5 कोटी खर्च करून हा पूल तयार करण्यात आला आहे उर्वरित पुलाच्या प्रवेशद्वारावरील मातीचा भराव अभावी हे काम रखडल. होत मात्र यासाठी देखील 1 कोटी 34 लाख मंजूर करून अखेर हे काम सुरु करण्यात आलंय येत्या काही दिवसात हा पूल सर्व वाहतुकीसाठी खुल होणार असल्याने प्रवासी तसेच स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version