| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्विमींग पूलमध्ये पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.11) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. पुण्यातील धायरी भागात पार्क व्हिव सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून एका 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. निनाद गोसावी (6) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. निनाद सोसायटीच्या आतमध्ये बराच वेळ खेळत होता. मात्र, खूप वेळ झाल्यानंतर चिमुकला घरी परतला नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी निनाद स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली.