| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील मुंबई निवासी सखाराम एकनाथ केसरकर हे गेल्या दोन वर्षांपासून लिव्हरचया आजाराने ग्रस्त आहेत. सध्या ते जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन वर्षांपासून घरातील सर्व जे काही होते ते उपचारासाठी खर्च झाले. सध्या त्यांचा आजार बळावला असल्याने तातडीने लिव्हर प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च करणे त्यांच्या कुटुंबाला शक्य नाही. म्हणूनच दानशूर नागरिकांना आर्थिक मदतीची विनंती करण्यात येत आहे. सखाराम केसरकर हे विवाहित असून, त्यांचे वय 40 वर्षे आहे. त्यांना चौदा वर्षांचा मुलगा आणि तेरा वर्षांची मुलगी अशी दोन अपत्य आहेत. दानशूरांनी पुढील बँकेच्या खात्यावर यथाशक्ती आर्थिक मदत करावी तसेच अधिक माहितीसाठी नारायण केसरकर 9820999450 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालसुरे यांनी केले आहे.