ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनिल खेडेकर यांचा सन्मान

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

अनेक सामाजिक संस्थांमध्ये विधायक कार्य करणारे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्कीय सेवेबद्दल सहकार्य करणारे, कोरोना काळातील लसीकरण व इतर अनेक सेवांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी असणारे पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनिल खेडेकर यांना नुकतेच ज्येष्ठ प्रिय कार्यकर्ता सन्मानाने गौरविण्यात आले. शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहा.आयुक्त, समाजकल्याण रायगड यांचेकडून पनवेल येथील डॉ.आंबेडकर भवन येथे शाल, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणार्‍या अनेक समस्या, ग्रामीण भागातील एकाकी जीवन जगणार्‍या ज्येष्ठांचे जीवन, तसेच 60 ते 65 वयोगटातील ज्येष्ठांना परिवहन महा मंडळाकडून प्रवासी भाडयात सूट देणे कामी होणारी टाळाटाळ इ. प्रश्‍नांचा ऊहापोह यावेळी करण्यात आला. शासन स्तरावर या सर्व गोष्टींचा विचार व्हावा अशी विनंती यावेळी सहा.आयुक्त यांना करण्यात आली.

Exit mobile version