सचिन घाडी पुरस्काराने सन्मानित

। सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील सर्वसामान्य जनमानसात आपल्या सामाजिक कार्याबद्दल प्रसिद्ध असणारे मूनवली मापगाव येथील सचिन हरिश्‍चंद्र घाडी यांना दि.28 मार्च रोजी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024’ ने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील जनसेवा करणार्‍या वैद्यकीय, शिक्षण, समाजसेवा, कला व कृषी क्षेत्रातील गुणिजनांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याला सतिश घाडी व मित्रपरिवार उपस्थित होते. सचिन घाडी यांना सामाजिक कार्यात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version