। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत सरकारच्या 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. पुढील पाच वर्षात सरकार विद्यार्थ्यांना दहा हजार फेलोशिप देणार आहे. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी ही फेलोशिप असणार आहे. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
अर्थसंकल्पानुसार, भारतीय भाषा पुस्तक योजना लागू करणार. यातून शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणे सोपे जाणार आहे, आयटीची क्षमता वाढवली असून 6500 जागा वाढवण्यात आल्या, ‘एआय’च्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार, अटल टिंकरिंग लॅब – अशा 50 लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील, सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.
पुढील वर्षी संपूर्ण भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 10,000 जागांची भर पडणार आहे. पुढील पाच वर्षांत एकूण 75,000 जागांची भर घालण्याची सरकारची योजना आहे. येत्या पाच वर्षांत देशात सुमारे 50000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
तरुणांना ‘मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड’साठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी जागतिक कौशल्यासह देशात सुमारे पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना केली जाईल.