। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, देशातील 70 टक्के महिला आर्थिक उपक्रमांमध्ये सामील झाल्या आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून, केंद्र सरकारने पहिल्यांदाच पाच लाख महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे.
या योजनेत महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपये टर्म लोनची सुविधा मिळेल. महिलांना विना गॅरेंटी सहज अटींवर लोन मिळेल. याचा 5 लाख महिलांना फायदा होणार आहे. तसेच, महिलांना उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांची जोडण्याची संधी दिली जाईल. या योजनेअंतर्गत महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांचा (SC ST Woman) यात समावेश करण्यात आला आहे. तसेच, गर्भवती महिला आणि लहान मुलांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून त्या अंगणवाडी अधिक मजबूत करतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, निर्मला सीतारमन यांनी पोषण 2.0 ची घोषणा केली. या पोषण योजनेअंतर्गत, कुपोषण दूर करण्यासाठी आणि मुले व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना पोषण आहार दिला जातो. याच पोषण योजनेअंतर्गत, पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना, पोषण अभियान, अंगणवाडी सेवा योजना, पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि किशोरवयीन मुलींसाठी योजनांचा यात समावेश आहे.