। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत सरकारच्या 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी यंदा आठव्यांदा भारताचा अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया.
या गोष्टी झाल्या स्वस्त
दागिने, इलेक्ट्रोनिक वाहने, कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे, एलईडी आणि एलसीडि टीव्ही, चामडीच्या वस्तु, लहान मुलांची खेळणी स्वस्त, भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे स्वस्त होणार, विमा स्वस्त होणार, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर औषधांवारील कस्टम ड्यूटि हटवण्यात येणार आहे. 35 जीवनावश्यक औषधे करामधून वगळली आहेत.
या वस्तू महाग होण्याची शक्यता
इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात येणार आहे. यामुळे फ्लॅट टीव्हीसारख्या वस्तूंची किंमत वाढेल.
विणलेले कपडे महाग होणार.