पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
I पाली/बेणसे I वार्ताहर I
क्रीडा व युवक सेवा संचालनालाय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अंतर्गत तालुका क्रीडा संकुल समिती सुधागडद्वारा आयोजित तालुका क्रीडा संकुलाचे सोमवार, दि. 28 जून रोजी सकाळी 11.00 वाजता लोकापर्ण करण्यात येणार आहे.
या क्रीडा संकुलाचे उद्घााटन जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खा. सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे, आ. जयंत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे (विधानपरिषद), आ. रवींद्र पाटील, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय महाडिक, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, तहसीलदार दिलीप रायन्नावा