। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील घुमेश्वर गावाला पाणी पुरवठा साठवण टाकीची आवश्यकता होती. गावची ही गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडीक यांच्या प्रयत्नातून प्रसिद्ध उद्योगपती दीपक अग्रवाल यांच्या अर्थसहाय्याने स्व. सावित्रीबाई गौरीशंकर अग्रवाल यांच्या स्मरणार्थ पाणी साठवण टाकी बांधून देण्यात आली. या पाणी साठवण टाकीचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि.26) पार पडला. यावेळी रायगड भूषण व नाना पालकर स्मृती समितीचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक, गावचे अध्यक्ष मधुकर गायकर, श्रीकांत बिरवाटकर, समीर गायकर, प्रकाश धुमाळ, संजय लटके, जगदीश लटके, धोंडू घोले व सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.