। श्रीवर्धन शहर । वार्ताहर ।
ताश्कंद, उझबेकिस्तान येथील यूनुसोबोध स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 23 ते 25 मे दरम्यान वी.ए.के.एफ. एशियायी सिनियर चॅम्पियनशिप आणि एशियायी पैरा-कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 31 सदसीय भारतीय कराटे संघ देखील उझबेकिस्तान येथे पोहचला आहे. या संघाची निवड 1 एप्रिल रोजी हैद्राबाद येथे झालेल्या केआईओ राष्ट्रीय स्पर्धेमधून करण्यात आली होती. कराटे इंडिया ऑर्गनाईझेशनचे अध्यक्ष भरत शर्मा, महासचिव संजीव कुमार जगडा आणि कोषाध्यक्ष मुतुमसिंह बंकिम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. ताश्कंद येथे 20 दिवसाचे प्रशिक्षण झाल्यानंतर स्पर्धा होणार आहे. भारत सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाकडून मंत्री रक्षा खडके यांनी भारतीय संघाला पाठिंबा शुभेच्छा दिल्या आहेत.